महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला



पालिका वर्तुळात खळबळ

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेची वेबसाइटवर सायबर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) समोर आली. दरम्यान या सायबर हल्यामुळे पालिका वर्तुळात खळ्बळ उडाली. विशेष म्हणजे यापूर्वी पालिकेची वेबसाइट हॅकर्सनी हॅक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे वारंवार नाशिक पालिकेची वेबसाइट हॅकर्सच्या टार्गेटवर असल्याचे दिसून येत आहे.

हॅकर्सकडून नेहमीच बँक, शासकीय संस्था यांच्यावर सायबर हल्ला केला जातो. शासकीय वेबसाईट यांच्यावर हॅकर्स हल्ला करत असतात. त्याचे कारण म्हणजे शासकीय वेबसाईटची नियमित तपासणी होत नाही. फार लक्ष दिले जात नाही. म्हणून हल्ला करणे सहजसोपे असल्याचे समोर आले आहे. नाशिक महानगर पालिकेची अधिकृत वेबसाईटवर सायबर हल्ला केल्यानंतर हॅकर्सने त्यावर हॅक केल्याची इमेज सुद्धा अपलोड केली होती. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर हॅकर्सने सायबर हल्ला केल्याचं स्पष्ट झाले आहे. हॅकर्सने यावेळी संपूर्ण डेटा हॅक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याने साईट हॅक झाल्याचा फोटो अपलोड केला आहे.नाशिक महानगर पालिकेच्या जाहीर केलेले वृत्त प्रसारण आणि घोषणा करणारा टॅब वर हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते. यापूर्वीही याच वेबसाईटवर सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात होती, वेबसाईटवर झालेला हल्ला तो कशाप्रकारे झाला, हे तपासणे महत्वाचे आहे. तसेच हा हल्ला कोणी, कधी, कशाप्रकारे केला आहे, याचा पुरावा गोळा करणे आणि संबंधितावर कारवाई करणे आवश्यक आहे. यासहमहापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला वेबसाईट सुरक्षित करून घेणे आणि वारंवार वेबसाईट हॅक का केली जात आहे. याचेही कारण शोधणे आवश्यक असल्याचे मत सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वेबसाइटवर हल्ला झाल्यानंतर पालिकेचे संकेतस्थळ दुपारपर्यत सुरु झालेले नसल्याचे चित्र होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *