ठाकरे गटाला पुन्हा धक्का

 

सुरगणाच्या नगराध्यक्षसह नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : प्रतिनिधी

शिव सेना सचिव भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला दिला जोरदार झटका दिला असून खा. संजय राऊत नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतानाच सुरगाणा नगरपंचायत उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष , गटनेता सह सर्व नगरसेवक यांचा आज मुख्यमंत्री मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सचिव भाऊ चौधरी, संपर्क प्रमुख सुनील पाटील उपस्थित होते.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष भारत वाघमारे, नगरसेवक (गटनेता) सचिन आहेर, नगरसेवक भगवान आहेर, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई वाघमारे यांच्या सह कार्यकर्ते दिनेश वाघ, विलास गोसावी चारोस्कर, गौरव सोनवणे आदी प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राऊत यांच्या वाचाळ वृतीस कंटाळून उद्धव ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *