नाशिक

दुचाकी पेटवून समाजकंटक झाले फरार

चौथ्या घटनेमुळे मनमाड शहरात भीतीचे वातावरण

मनमाड ः प्रतिनिधी
मुंबई, पुणे, नाशिक यांसह मोठ्या शहरांत वाहन जाळण्याच्या घटना वारंवार घडतात. मात्र, याचे लोण मनमाड शहरात पोहोचले असून, इंडियन हायस्कूलजवळ एका घराबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दोन दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटून फरार
झाले.
आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या असून, घराच्या दारालादेखील झळ पोहोचली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मनमाड शहरात ही चौथी घटना घडली असून, याआधी अशा तीन घटना घडल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या सर्व्हे नंबर 52 इंडियन हायस्कूलजवळील परिसरातील एका घरासमोर असलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्या असून, या आगीत दोन्ही मोटारसायकली भस्मसात झाल्या आहेत.
याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. मनमाड शहरात ही चौथी घटना घडली असून, याआधी आंबेडकर चौक, विवेकानंदनगर तसेच हनुमाननगर या भागात घटना घडल्या आहेत.
आजची ही चौथी घटना आहे. मनमाड शहरातदेखील आता मुंबई, पुण्यातील राजकारणांची झळ लागली असून, शहरात असे गुन्हे घडत आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा

मनमाड, नांदगाव शहरात ऑर्गनाइझ क्राइमदेखील घडत असून, छोट्या-मोठ्या कारणावरून थेट घातक शस्त्राने वार करण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करावे व असे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना हद्दपार करावे, अशी मागणी शहरातील सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago