सिन्नर : प्रतिनिधी
येथील सहायक निबंधकास साडे पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी आज दुपारी रंगेहाथ पकडले. एकनाथ प्रताप पाटील असे लाचखोर सहायक निबंधकाचे नाव आहे.
पाथरे येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तक्रारदार काम करतात.पतसंस्थेतील थकित कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीसाठी कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात एकनाथ पाटील यांनी तक्रारदाराकडे एका नोटिसीचे 1500 रुपये असे एकूण 25500 रुपयांची लाच मागीतली होती. त्यापैकी 15500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंके, सहायक फौजदार सुखदेव मुरकुटे,हवालदार पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लाचखोरी वाढली
गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. भूमिअभिलेख विभागात चारच दिवसांपूर्वी लिपिकाला तर त्याअगोदर भूमि अभिलेख अधीक्षक व लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून लाचखोरी वाढीला लागली आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…