नाशिक प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर ओंकार पवार यांची नियुक्ती शासनानं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे. ओंकार पवार हे इगतपुरी विभागाचे सहायक जिल्हाधिकारी या पदावर सध्या कार्यरत होते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद कनिष्ठ श्रेणीत अवनत करून ही बदली करण्यात आली आहे. या पदावर येण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती,