रोजगार मेळाव्यात 110 जणांना नियुक्तीपत्र

यूथ फेस्टिव्हल मैदानात झाला कृषी मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात काल तिसर्‍या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 1550 युवकांनी सहभागी होऊन मुलाखती दिल्या, तर त्यापैकी 110 जणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरीचे नियुक्तीपत्र आबासाहेब व चंद्रकांतदादा मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यूथ फेस्टिव्हल मैदानात 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या जागतिक कृषी मेळाव्यात काल सकाळी चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे, अजय बोरस्ते, विशाल संगमनेरे, निरंजन मोहिते, आशिष राऊत यांच्या हस्ते दीपपूजन करून रोजगार मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यभरातून नोकरीसाठी इच्छुक तरुण, तरुणी व त्यांचे पालक यांनी मुख्य सभामंडपात गर्दी केली होती. चंद्रकांत मोरे यांनी यानिमित्त सांगितलं की, श्री स्वामी समर्थ सेवामार्ग समाजासाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबवित असून, बेरोजगार युवकांना अपेक्षित रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, आजचा रोजगार मेळावा या हेतूनेच आयोजित केला आहे. इच्छुकांनी समर्थ केंद्राच्या संपर्कात राहून विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. आजच्या मेळाव्यात एडिमॅक्स, श्रीपाद, बा. व्ही.जी., बॉश, एलआयसी, महेंद्र, एचडीएफसी, कोटक, टाटा, एसबीआय, सिन्युमेरो, निलाचल, बजाज, सीटीआर अशा विविध 60 कंपनी, बँकांनी सहभागी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नियुक्ती दिली तर काही उमेदवारांना पुढील मुलाखतीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल, असे सांगितले.

Appointment letters to 110 people at the employment fair

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *