लासलगाव बाजार समितीच्या प्रशासक पदी सविता शेळके यांची नियुक्ती

 

लासलगाव :  प्रतिनिधी

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक यांनी काढले आहे.त्यानुसार लासलगाव बाजार समितीवर
प्रशासकपदी चांदवड येथील सहाय्यक निबंधक सविता शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे बाजार समितीवरील सभापती व संचालकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

या बाजार समित्यांच्या कारभार पाहणाऱ्या व्यवस्थापन मंडळांची कारकीर्द संपलेली असताना दोन वेळा मुदतवाढ मिळाली होती,जवळपास पावणेदोन वर्ष या मंडळाला मुदतवाढ मिळाली होती त्यामुळे निवडणुकाही पुढे ढकलल्या होत्या.येत्या एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत राज्यसरकारने दिले असून आता बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

जिल्हा निबंधकांच्या आदेशाने या नियुक्त्या केल्या असून निवडणूक होऊन नवीन प्रशासक मंडळ नियुक्त होईपर्यंत बाजार समित्यांचा कारभार आता प्रशासक पाहणार आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितिच्या प्रशासकपदी चांदवड येथील सहाय्यक निबंधक सविता शेळके यांची नियुक्ती झाली आहे.बुधवार दि 11 रोजी सविता शेळके यांनी लासलगाव बाजार समितीचा प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला यावेळी बाजार समितीतील प्रशासकीय घटक उपस्थित होते.लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा,डाळिंब भाजीपाला यासह धान्य लिलाव मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे या बाजार समितीचा कारभार पाहण्याची जबाबदारी प्रशासक यांच्या समोर आव्हानात्मक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *