शिवपुत्र संभाजी महानाट्याला मविप्र कडून एक दिवसाचे प्रायोजकत्व
नाशिक ःप्रतिनिधी
इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचविणे ही आपली गरज आहे.जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही .या महानाट्यातून माती माता आणि मातृभूमी यांची सेवा रक्षण आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी जे संभाजी महाराजांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले.हि प्रेरणा प्रत्येक युवकाने घ्यावी.या उद्देशाला मविप्रसारखी सक्षम नावाजलेली संस्था पाठीशी उभी राहते तेव्हा खरोखर कृतज्ञ वाटते संस्थेची वेगळी सामाजिक जबाबदारी पुढच्या पिढीपर्यत घेतात याचे कौतुक वाटते असे डॉ.अमोल कोल्हे यांनी मविप्र संस्थेत (दि.11)पत्रकार परिषदेत माहिती दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले,सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,शिक्षणाधिकारी डॉ अशोक पिंगळे, डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,डॉ अजित मोरे, प्रा संजय पाटील आदी उपस्थित होते.
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन शहरात तपोवन साधुग्राम येथे दि.21 ते 26 जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.यामहानाट्यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे.सशुल्क असणार्या या महानाट्याची एक दिवसाची स्पॉनशिप मविप्र संस्थेने घेतली आहे.याबाबत संस्थेचे अध्यक्ष ऍड नितीन ठाकरे, यांनी चोवीस तारखेचे प्रायोजकत्व घेतले असल्याचे सांगितले.प्रतिसाद मिळाल्यास अजून एक दिवस प्रायोजकत्व वाढविण्याची शक्यता आहे.संस्थेच्या शिक्षक,विद्यार्थी,सभासद,पदाधिकारी यांनी महानाट्याचा लाभ घ्यावा.असे आवाहनही केले.
संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यतचे हे महानाट्य आहे.विशेषतः शालेय शिक्षणामध्ये हा इतिहास केंद्रीय,किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये किंवा इतर शाळांमधील ङ्गार कमी असल्यामुळे भावी पिढीला आपला इतिहास कळावा छत्रपतींचे शोर्य,योगदान यासर्व गोष्टी समजाव्या यासाठी या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर करीत आहोत.पंधरा वर्षानंतर महानाट्याचे आयोजन नाशिकमध्ये होत आहे.महाराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंत दररोज महानाट्याचा तोच प्रयोग होणारआहे.एतिहासीक महानाट्याच्या प्रयोगबाबत तरुणाईला नाशिक जिल्ह्यातून सकारात्मक उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद मिळत आहे.यामध्ये मराठा विद्या प्रसारक ंसंस्थेने चोविस तारखेचा संपूर्ण शोचे प्रायोजकत्व घेतले आहेत. (9हजार 300)लोकांची तपोवन साधुग्राम येथे आसनव्यवस्था करण्यात आली आहे.मविप्र हि अग्रगण्य संस्था अशा पद्धतिने हा इतिहास पोहचविण्यासाठी सोबत उभी राहीली आहे त्याबद्दल मविप्रच्या सर्वच पदाधिकार्यांचे आभार मानले.
राजकारण्यांना महापुरूषांच्या वक्तव्याबद्दल आचार संहिता लावावी का याबाबतीत विचारले असता अशी मागणी आम्ही संसदेकडे करीत आहोत.हे गरजेचे आहे.जाणिवपूर्वक अशा गोष्टी करीत असेल तर त अत्यंत दुर्दवी आहे.महापुरूषांच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे कि त्यानी या राष्टासाठी,समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या उचीत प्रेरणा घेतल्या तर त्यांच्या विचारांचा उचित सन्मान होवू शकेल.असे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…