नाशिक

शक्तिपीठ महामार्गास मंजुरी

महाराष्ट्र जीएसटी कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मंगळवारी (दि.24) मंत्रालयात झाली. यात शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणार्‍या या महामार्गास अनेक जिल्ह्यांत शेतकर्‍यांचा विरोध असतानाही मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी, आंदोलक आक्रमक होतील असे दिसते. राज्यात वस्तू व सेवाकर विधेयक आणण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची रचना केली आहे. शक्ती द्रुतगती महामार्गामुळे प्रवासाचा वेळ 18-20 तासांवरून फक्त 8-10 तासांपर्यंत कमी होईल. 12 जिल्ह्यांत कनेक्टिव्हिटी वाढवून पर्यटन, प्रादेशिक विकास आणि आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यास प्रोत्साहन देणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होतो आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमधून जातो. जलद व अधिक सोयीस्कर मार्ग तयार करून हा प्रकल्प प्रादेशिक पर्यटन आणि विकासाला चालना देणार आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबाजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार येणार्‍या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारने घेतलेले निर्णय असे
♦आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यात दुपटीने वाढ.
♦ कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता.
♦महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करून, आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विधेयक आणणार.
♦सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार.
वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे 31 कोटी 75 लाखांचे शुल्क माफ.
♦ पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मौजे चिखली येथील ‘दफनभूमी’च्या एक हेक्टर 75 आर क्षेत्रापैकी 40 टक्के क्षेत्र (7000 चौ.मी.) मैला शुद्धीकरण केंद्रासाठी वापरण्यास मंजुरी.
♦ महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणार्‍या दोन हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय.

गोळीबार केला तरी जमिनी सोडणार नाही

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाचे नेते राजन क्षीरसागर यांनी महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पास मान्यता देणार नाहीत. महाराष्ट्राला कर्जात बुडवणारा आणि शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या जमिनी कवडीमोलाने घेण्याचा हा सरकारचा डाव आहे. गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपल्या जमिनी सोडणार नाहीत, असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

गोफणी तयार करून ठेवा ः राजू शेट्टी

या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. शेतकर्‍यांच्या जमिनी काढून घेऊन आवश्यकता नसताना हा महामार्ग केला जात आहे. त्यापेक्षा जिथे शक्तिपीठे आहे तिथे सरकारने निधी द्यावा. बारा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्ग कधीही होऊ देणार नाही. गोफणी तयार करून ठेवा. सर्व्हे करायला ड्रोन येतील तेव्हा ते गोफणीच्या दगडाने पाडा, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

Gavkari Admin

Recent Posts

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

17 minutes ago

सिन्नर पालिकेत 15 प्रभागांत निवडून येणार 30 नगरसेवक

प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…

21 minutes ago

मनमाडला प्रभागरचनेबाबत कहीं खुशी कहीं गम

नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…

26 minutes ago

त्र्यंबकेश्वरला सुट्ट्यांमुळे व्यवस्था कोलमडली

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…

31 minutes ago

जनआक्रोश मोर्चाची तयारी; मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…

34 minutes ago

एमडी विक्री करणारे तीन आरोपी अटकेत

एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…

39 minutes ago