जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 10 जवानांचा मृत्यू

जम्मू :
जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराचे एकूण 21 जवान एका वाहनातून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक हे वाहन दरीत कोसळले. या अपघातात 10 जवानांचा मृत्यू झाला आणि 10 गंभीर जखमी झालेल्या जवानांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी असलेल्या एका जवानावर भादरवाह रुग्णालयात उपचार
सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस आणि लष्करी अधिकारी जखमी जवानांवर उपचार आणि त्यांच्या शिफ्टिंगची देखरेख करण्यासाठी भदरवाह रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच आरोग्यसेवा कर्मचारी आणि डॉक्टरांना मदत करण्यासाठी जीएमसी डोडाच्या रुग्णवाहिकेसह डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची एक टीमदेखील तैनात करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, डोडा येथे झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात आपल्या 10 शूर भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले आहे. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले आहेत. मी त्यांना लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील भदरवाह-चंबा मार्गावर एक्स-पोस्टजवळ खन्नी टॉप येथे लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या.

Army vehicle falls into valley in Jammu and Kashmir, 10 soldiers killed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *