पीएफआय च्या एकास मालेगाव मधून अटक

पी एफ आय च्या एकास  मालेगाव येथून अटक
नाशिक: पीएफआय या सघटनेच्या एकास मालेगाव येथून  अटक करण्यात आली आहे, सैफुर रहमान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे,
एन आय ए ने आज सकाळपासून राज्यात ठिकठिकाणी छापे टाकले, संभाजी नगर, पुणे, मुंबई या भागात एकाच वेळी छापे टाकण्यात आली, एटी एस, एन आय ए, इडी अशा यंत्रणा मार्फत ही कारवाई करण्यात आली, टेरर फंडिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली, देश विघातक कारवायत सहभागी असल्याचा संशय आहे
एन आय ने देशभरात कारवाई सुरू केली असून, आज मुंबई, परभणी, नांदेड, नाविमुंबई, मुंबई, मालेगाव या ठिकाणी छापे टाकले, राज्यात आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे,

PFI संघटना म्हणजे काय?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना आपल्या समुदायातील मागासवर्गीय आणि मागे पडलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करते. 2006 मध्ये नॅशनल डेवलपमेंट फ्रंटची  उत्तराधिकारी संघटना म्हणून स्थापन करण्यात आली. या संघटनेचे मुख्यालय दिल्लीतील शाहीन बाग येथे असल्याचे समजते. आज सकाळी या संघटनेच्या विविध ठिकाणी असलेल्या पद धिकारी यांना ताब्यात घेतल्याने ही संघटना चर्चेत आली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *