मनमाड : आमिन शेख
सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखाव्याच चित्रीकरण केले व संशयास्पद हालचाली केल्याच्या कारणावरून आय बी व दहशतवादी पथकाने 2006 साली मालेगाव बॉम्ब स्फोटातील एका आरोपींला नगरसोल येथून अटक केली असुन त्याची मनमाड येथे 7 तास कसून चौकशी करून काहीही हाती न आल्याने त्याला सोडुन देण्यात आले आहे.
2006 साली मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या एकावर इंटेलिजन्स ब्युरो व दहशतवादी पथकाची करडी नजर होती तो मनमाड येथून रात्री रेल्वेने औरंगाबादकडे जाणार असल्याची माहिती मनमाड पोलिसांना देण्यात आली होती मात्र काही वेळाने गाडी सुटली व तो मनमाड पोलिसांच्या हातुन निसटला मात्र तात्काळ रेल्वेच्या पोलिसांशी संपर्क साधुन त्याला येवला तालुक्यातील नगरसोल या रेल्वे स्थानकावर उतरवून घेण्यात आले यानंतर मनमाड पोलिसांच्या हवाली करण्यात आले त्याला रात्रीं मनमाड येथे आणुन इंटेलिजन्स ब्युरो व दहशतवादी पथकाकडुन सुमारे 7 तास चौकशी करण्यात आली मनमाड व मालेगाव येथे काही गणेश मंडळाच्या देखाव्याच चित्रीकरण करण्यात आल्याची माहिती असल्याने त्याबद्दल तपास करण्यात आला मात्र काहीच न सापडल्याने त्याला सोडुन देण्यात आले.
2006 सालचा मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी…?
इंटेलिजन्स ब्युरो व दहशतवादी पथकाची 2006 साली मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींसह इतर अनेक दहशतवादी कारवाया करणाऱ्यावर करडी नजर आहे हा देखील यातील एक प्रमुख आरोपी आहे याच्यावर देखील त्यांची करडी नजर होती यामुळेच मनमाड पोलिसांना त्यांच्याबाबत माहिती देण्यात आली मात्र थोड्याशा अंतराने तो रेल्वेने निघून जाण्यात यशस्वी झाला होता मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय…?
मालेगावच्या या आरोपींने मालेगावसह मनमाड येथील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे चित्रीकरण केल्याचा आरोप असुन याबाबत त्याची कसून चौकशी केली आहे मात्र हाती काही न लागल्याने त्याला सोडुन देण्यात आले आहे मात्र गणेशोत्सव काळात काही घातपाती कारवाई करण्याचा असलेला त्यांचा कट मात्र
इंटेलिजन्स ब्युरो व दहशतवादी पथकाने उधळून लावला आहे.
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…
नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…
ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको : विशेष प्रतिनिधी असे…