मुलाखत : अश्विनी पांडे
कला असेल तर निश्चित संधी!: अभिनेता चिन्मय उदगिरकर
तुमच्याकडे कलागुण असतील तर अभिनय क्षेत्रात तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. पण तुम्हाला संधी मिळेपर्यंत संयम बाळगत आशावाद आणि सकारात्मक विचार या आधारे प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला नाशिककर अभिनेता, निर्माता चिन्मय उदगिरकर यांनी अभियन क्षेत्रात येऊ पाहणार्या युवकांना दिला. दै. गांवकरीशी बोलताना त्यांनी संवाद साधला.
शिक्षण कुठे झाले?
माझे माध्यमिक शिक्षण सीडीओ मेरी शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण एचपीटी आरवायके महाविद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण एनबीटी लॉ महाविद्यालयात झाले.
अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात कशी झाली?
बालपणी माझ्यातलंी कला पाहुन आमच्या सोसायटीतील चव्हाण काकांनी मला गणेशोत्सवानिमीत्त आयोजित बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेण्यास सांगितले. मीही सहभागी होत बालनाट्यात काम केले. तेव्हापासुन माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात झाली. त्यांनंतर मी शाळेतील बालनाट्य स्पर्धेतही सहभाग घेण्यास सुरूवात केली.. महाविद्यालयात असताना स्वप्नगंधा व जिनियस नावाचा थियटर ग्रुप जॉईंन केला.त्यावेळी मी ऑडिशन देत होतो आणि माझी स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेसाठी निवड झाली. खर्या अर्थाने माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात झाली.
सर्वांत आवडलेली भूमिका कोणती?
स्टार प्रवाह वरील स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतील माझी श्रेयस पाटकरची भूमिका माझ्यासाठी खुप जवळजी आहे. कारण मी ऑनस्क्रीन पहिल्यांदा अभिनय केला होता.
ड्रीम रोल कोणता?
बॅटमॅनचा रोल करायला आवडेल. ओशो, डॉ. राजेंद्र सिंह या व्यक्तीमत्वावर आधारित चित्रपटात त्यांची भूमिका करायला आवडेल.
अभिनय क्षेत्रात नसतात तर?
अभिनय क्षेत्रात नसतो तर सामाजिक क्षेत्रात असतो. आताही मी वेळ मिळेत त्या प्रमाणे गोदावरी संवर्धनाच्या कार्यात सहभागी होत असतो.
प्रेक्षकांसाठी नवीन प्रोजेक्ट?
येत्या काळात दोन नवीन चित्रपट रिलिज होणार आहेत. दोन सिनेमाचे शुटिंग सुरू आहेत. एका वेबसिरीज शुटिंगही पूर्ण झाले आहे. याशिवाय योग योगेश्वर जय शंकर ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरू आहे.
आठवणीतील फॅन मुव्हमेंट?
मी इंडोनेशियात गेले होतो. त्यावेळी तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यामुळे विमानसेवा बंद झाली. त्यावेळी इंडोनेशियात राहणारे मराठी कुटुंब माझी मालिका पाहत होते. मी इंडोनेशियात अडचणीत असताना त्या कुटुंबाने सहकार्य करत भारतात पोहोचण्याची माझी व्यवस्था केली. ही फॅन मुव्हमेंट माझ्यासाठी खूप जवळची आहे.
कोणत्या माध्यमात काम करायला आवडते?
मला सर्वच माध्यमात काम करायला आवडते. जिथे भूमिका चांगली ते काम चांगले होते. माध्यमापेक्षा भूमिका माझ्यादृष्टीने जास्त महत्त्वाची आहे.
निर्मिती की अभिनय?
निर्मिती ही एक असल्याने निर्मीती आणि अभिनय दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या व जवळच्या आहेत.
कुटूंबासाठी वेळ कसा काढता?
कुटुंबासाठी वेळ काढला जातो. माझ्यासाठी कुटूंब या संकल्पनेची व्याप्ती विस्तृत आहे. माझे मित्र, गोदावरी संवर्धनासाठी माझ्यासोबत काम करणारे हे सर्वच माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. या सर्वांच्या भेटीगाठी मी आवर्जून वेळ काढत असतो.
आवडता खाद्यपदार्थ,ठिकाण, रंग?
आईने बनवलेले सर्व पदार्थ आवडतात. पण विशेष करून साधा वरण भात जास्त आवडतो. नाशिक जिल्हयात असलेल्या सर्वच पर्यटनस्थळावर फिरायला जाण्यास आवडते. केशरी आवडता रंग आहे..
लग्न कसे जुळले?
मी आणि गिरीजा चांगले मित्र मैत्रिण होतो. आमच्या दोघातली मैत्री पाहुन आईने गिरीजाला लग्नाबद्दल विचारले आणि आमचे लग्न जुळले.
फिटनेस रहस्य ?
सकारात्म विचार हेच चांगल्या फिटनेसचे रहस्य आहे. विचार सकारात्मक असतील शरीर फिट राहते.
वेळ मिळेल तेव्हा कोणता छंद जोपासता?
वेळ मिळेल तेव्हा पुस्तक वाचण्यास, चित्रपट पाहण्यास आवडतात. रोजही यासाठी ठराविक वेळ काढला जातो.
लाईफस्टाईल कशी आहे?
लाइफस्टाइल चौकटबध्द नाही. शुटिंगच्यावेळेनुसार लाइफस्टाइल असते.
अभिनय क्षेत्रात येऊ पाहणार्या तरूण तरूणींना काय संदेश द्याल?
सकारात्मक राहा, तुमच्याकडे कलागुण असतील तर अभिनय क्षेत्रात तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. फक्त या गोष्टीसाठी किती वेळ लागेल हा तुमच्या नशिबाचा भाग असु शकतो. पण तुम्हाला संधी मिळेपर्यंत संयम बाळगत आशावादा आणि सकारात्मक विचार या आधारे प्रयत्न करायला हवेत.
.