भारताला 749 कोटी परकीय चलन; अमेरिका, जर्मनीत मागणी
लासलगाव : समीर पठाण
भारताची फुलांच्या निर्यात क्षेत्रात झेप कायम आहे. कृषी आणि प्रक्रिया, अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत देशातून 21,024.41 टन
फुले व उत्पादने निर्यात झाली आहेत. यातून 749.17 कोटींंचे परकीय चलन देशाला मिळाले आहे.
भारत सरकारने फुलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्याला 100 टक्के निर्यातभिमुख असा दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबाग लागवडीच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे. म्हणूनच व्यावसायिक फुलशेती ग्रीन हाउसच्या अंतर्गत हवामान नियंत्रित हाय-टेक अॅक्टिव्हिटी म्हणून उदयास आले आहे.
फुलांच्या निर्यातीमध्ये गेल्या काही वर्षांपासून स्थिर वाढ दिसत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निर्यात मूल्यामध्ये वाढ झाली असून, भारत जागतिक फूल बाजारात आपली उपस्थिती मजबूत करत आहे.
फुलशेतीतून 749 कोटींची निर्यात ही सकारात्मक बाब असली, तरी भारताचा जागतिक बाजारातील वाटा अत्यल्प आहे. शाश्वत वाढीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, दर्जेदार रोपे, निर्यातक्षम जाती आणि शेतकर्यांमध्ये जागरूकता या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. फुलशेतीकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
प्रमुख निर्यातक्षम फुले
गुलाब, रजनीगंधा, ग्लॅडिओलस, अँथुरियम, कार्नेशन, जासमीन, ऑर्किड, ट्यूलिप आणि झेंडू ही प्रमुख निर्यात होणारी फुले आहेत.
प्रमुख बाजारपेठा
भारतीय फुलांना सर्वाधिक मागणी अमेरिका, नेदरलँड्स, यूएई, यूके, जर्मनी, मलेशिया, इटली, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांकडून येते.
फुलशेती निर्यात आकडेवारी (टनांत)
सन 2019-20 16971 टन
सन 2020-21 15844 टन
सन 2021-22 23597 टन
सन 2022-23 21024 टन
सन 2023-24 19677 टन
सन 2024-25 21039 टन
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…