नाशिक

नाशिकमध्ये महिन्याला तब्बल 40 आत्महत्या

वीस महिन्यांत 802 जणांनी संपवले जीवन

नाशिक ः देवयानी सोनार
क्षुल्लक कारणाहून, तर कधी अपयश, कर्जबाजारीपणा, गरिबी, सासरी त्रास, सोशल मीडिया, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार आदी कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. सोशल मीडिया, अद्ययावत तंत्रज्ञान एआयमुळे तर आत्महत्या कशी करावी याचे धडे घेतले जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गेल्या वीस महिन्यांत तब्बल 802 जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.
आत्महत्या ही एक गंभीर आणि वाढती जागतिक समस्या ठरत आहे. सन 2024 मध्ये नाशिक जिल्ह्यात एकूण 463 जणांनी आत्महत्या केली होती, तर यावर्षी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 339 आत्महत्यांची नोंद झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण दुपटीने वाढत असून, दरवर्षी 4 टक्के वाढ नोंदली जाते. गेल्या वर्षी देशभरात 13 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, ते शेतकरी व नोकरी करणार्‍यांपेक्षा जास्त आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांत 2019 ते 2023 दरम्यान 98 आत्महत्यांची नोंद झाली. त्यांपैकी 39 आत्महत्या आयआयटीमध्ये झाल्या. शैक्षणिक ताण हे यामागचे प्रमुख कारण समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात आठ लाख आत्महत्या होतात. म्हणजे प्रत्येक 40 सेकंदाला कोणीतरी जीवन संपवते. आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांच्या तुलनेत 20 पट अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात, ही बाब अधिक चिंताजनक आहे. 2022 मध्ये भारतात सुमारे 1,71,000 आत्महत्या झाल्या, जो 2021 च्या तुलनेत 4.2 टक्क्यांनी वाढलेला आकडा आहे. 100,000 लोकांमागे आत्महत्यांचे प्रमाण 12.4 इतके झाले असून, ते 1967 नंतरचे सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, भारतातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास 41 टक्के आत्महत्या 30 वर्षांखालील तरुणांकडून होतात. दररोज सरासरी 160 तरुण आत्महत्या करत आहेत.

ही आहेत कारणे
प्रेमसंबध, शैक्षणिक अपयश
नात्यातील ताणतणाव
लग्नाची चिंता, डिप्रेशन
प्रेमभंग, विश्वासघात
नोकरीचे टेन्शन
कर्जबाजारीपणा
आर्थिक छळ
कौटुंबिक छळ

सोशल मीडियाचा प्रभाव

सोशल मीडिया दुधारी शस्त्र ठरत आहे. एका बाजूला आत्महत्या कशी करावी याबाबत इंटरनेटवर सहज माहिती मिळते, तर दुसरीकडे मानसोपचारतज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी हीच साधने उपयुक्त ठरत आहेत. मदतीची गरज असणार्‍यांना योग्य माहिती व समुपदेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे तरुण पिढीने सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आत्महत्या हा मानसिक आजारांचा सर्वांत गंभीर दुष्परिणाम. जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येने जीव गमावते. आत्महत्या म्हणजे मनाचा भेकडपणा नव्हे. त्यामागे काही विशिष्ट मानसिक आजार, व्यक्तिमत्त्व दोष, त्यावेळची ठराविक मानसिक अवस्था असते. त्यावर निश्चितपणे उपाय आहेत.
– डॉ. हेमंत सोननिस, मानसोपचारतज्ज्ञ

नाशिक शहरात अलीकडच्या काळात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कोणतीही अडचण, अडथळा किंवा ताणतणाव हा कायमस्वरूपी नसतो. त्यामुळे आत्महत्या हा कधीही समस्येचा उपाय ठरू शकत नाही. मानसिक ताणतणाव वाढत असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्यावा. आपले जीवन अमूल्य आहे, कोणत्याही समस्येवर योग्य मार्गदर्शन, मदत आणि संवाद यांद्वारे नक्कीच तोडगा काढता येतो.
– संदीप मिटके, सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago