नमामि गोदा अंतर्गत कामात नाल्यांचे पाणी ‘एप’त जाते
नाशिक : प्रतिनिधी
गंगा नदीच्या धर्तीवर नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्यात केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यासाठी १८०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
गोदा स्वच्छतेसाठी या नदीत मिसळणारे तब्बल छोटे व मोठे असे तब्बल ६७ नाले बंद केले जाणार आहेत.
लवकरच त्यासाठी सल्लागार समिती नेमण्याचे काम सुरू असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
गोदावरीसह उपनद्या स्वच्छ व सुंदर झाल्या पाहिजे, या अनुषंगाने महापालिकेकडून नंदिनी, वालदेवी, वाघाडी, कपिला या नद्यांचा समावेशदेखील प्रकल्पात करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर गोदेत मिसळणारे नाले व त्यामुळे प्रदूषित होणारे पाणी ही मुख्य समस्या आहे. त्यावर पर्याय म्हणून या प्रकल्पांतर्गत नाल्याचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पुढील काही वर्षांत मलवाहिकांची दुरुस्ती करणे, उपनद्यांमध्ये गॅम्बियन वॉल बांधणे, पुलावर संरक्षक कठडे बसवणे, नदीकाठचे सुशोभीकरण, घाटांचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे. गंगा नदीच्या धर्तीवर ‘नमामि गोदा प्रकल्प राबविला जात असून, त्यात उपनद्यांच्या समावेशासह आता गोदावरीत येऊन मिसळणाऱ्या ६७ नाल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नाल्यांचे पाणी पाइपलाइनद्वारे थेट मलशुद्धीकरण केंद्रात सोडले जाईल, जेणेकरून दूषित पाण्यामुळे गोदा प्रदूषित होणार नाही व नदीचे पावित्र्य अबाधित राहील. नाल्यांचे पाणी पाइपलाइनद्वारे आहे. थेट मलजलशुद्धीकरण प्रकल्पात सोडले जाईल. २०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी नमामि गोदा प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.