महाराष्ट्र

नाशिककरांना खाऊ घालणार तब्बल इतकी  किलो भगर

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त सेफ विष्णू मनोहर करणार विक्रम
नाशिक -प्रतिनिधी
प्रख्यात सेफ विष्णू मनोहर हे नाशिकमध्ये आपला सोळावा जागतिक विक्रम करणार असून, दि १२ फेब्रुवारी रोजी  महाराष्ट्र मिलेट्स मिशन, नाशिक भगर मिल असोसिएशन  यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात ते तब्ब्ल ४ हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घालणार आहेत. आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स मधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड होणार असून,  एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससह विविध ठिकाणी याची नोंद घेतली जाणार असल्याची माहिती सेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी  नाशिक  भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरीया , उमेश वैश्य, अशोक साखला, पारस साखला उपस्थित  होते.
युनेस्को ने २०२३ हे वर्ष मिलेट्स ( तृणधान्य  ) वर्ष  म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. भारत तृणधान्य उत्पादनात आघाडीवर आहे. युनेस्कोच्या या उपक्रमात तृणधान्य प्रचार आणि प्रसार च्या बाबतीतही भारताला सर्वोच्च स्थान  आहे.  तृणधान्यमधील  जीवनसत्व , शुद्धता आणि धान उत्पादकांचा फायदा नजरेसमोर ठेवून भारत अनेक उपक्रमातून याचा प्रचार प्रसार करणार आहे.  नाशिकची  भगर  भारतात प्रसिद्ध आहे . तिचा अधिक प्रसार व्हावा म्हणून नाशिक भगर मिल असोसिएशनने  पुढाकार घेऊन महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने  प्रख्यात सेफ विष्णू मनोहर यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .
जागतिक रेकॉर्ड
एकाच वेळी ४ हजार किलो पेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवून लोकांना मोफत वाटण्यात येणार आहे.  हे तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड होणार आहे. सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध  पंधरा रेकॉर्ड केले असून, नाशिक मधील हे त्यांचे १६ वे जागतिक रेकॉर्ड असणार आहे. याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्स मध्ये केली जाणार आहे.
नागपूरहून विशेष कढई
४ हजार किलो भगर एकाचवेळी शिजवण्यासाठी नागपूर येथे खास कढई तयार करण्यात आली आहे. त्या  कढईचे  वजन सुमारे दीड हजार किलो असून, १० बाय १० फूट व्यास आणि ५ फूट उंच आहे. त्यासाठी ३ प्रकारचे २२ किलो वजनाचे मोठे चमचे ही तयार करण्यात आले आहेत.
मोफत भगर वाटप
दि १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा भगर शिजवण्याच्या या उपक्रमास सुरवात होईल. ११. पर्यंत भगर शिजवून तयार होईल. यांनतर ती नागरिकांना मोफत वाटण्यात  येणार आहे. काही भगर नाशिकमधील अनाथालये , वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार आहे.
भगर ची खास रेसिपी …….
भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी
भगर ४०० किलो ,बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो,  तेल,१२५ किलो, पाणी २७०० लिटर , जिरा १२ किलो, शेंगदाणे  १०० किलो ,  शेंगदाणे कूट १२५ किलो,  दही ४०० किलो,  ५०किलो, तूप १०० किलो, दूध १०० लिटर  हे साहित्य वापरून ४ हजार किलो भगर तयार होणार आहे.
Devyani Sonar

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

19 hours ago