ऑयस्टरच्या चिमुकल्यांकडून आषाढी एकादशी

सिडको :

अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात न्हालेल्या वातावरणात आषाढी (देवशयनी) एकादशी उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी वेशभूषा परिधान करत उपस्थितांचे मन जिंकले. येत्या रविवारी (दि. 6) आषाढी एकादशी असल्याने शनिवार व रविवारची शाळेची सुट्टी लक्षात घेऊन शुक्रवारीच साजरी करण्यात आली. शाळेच्या आवारात पारंपरिक भक्तिगीतांचा गजर, ताशा-फुगड्यांचे स्वर आणि टाळ-मृदंगाच्या निनादात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा अनुभव आपल्या अभिनयातून साकारला. उत्सवाच्या यशामागे शाळेच्या संचालिका अनिषा गायकवाड यांची संकल्पना व प्रेरणा महत्त्वाची ठरली. कार्यक्रम यशस्वितेसाठी चैताली आव्हाटे, मंजूषा शेलार, मयूरी कारंडे, मिताली सिंग यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *