अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान

ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी

लासलगाव प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्याचा पूर्व भागामध्ये खेडलेझुंगे,कोळगाव,रुई-धानोरे,धारणगाव वीर, डोंगरगाव,गाजरवाडी,धारणगाव खडक,सारोळा थडी या गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.यामध्ये अनेक झाडे कोलमडून पडले आहे.तर उभे पिके आडवी झालेली आहे.मागील पंढरवाड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटकुटीला आलेले आहे.
सुपारीच्या अकराच्या पाण्याच्या थेंबामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतामधील उभ्या मक्याचे पीक आडवे होऊन शेतात पडून गेलेली आहे.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.सतत च्या पावसामुळे पिकांपर्यंत शेतकऱ्यांना पोहचता येत नसल्याने आडवे झालेले पीक सडणार आहे.पडलेल्या मक्याच्या कणसामध्ये दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे.

या पिकांचे नुकसानमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यातच शेतकऱ्यांना शेतातील पिके उभे करताना शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे त्यात शेतकऱ्यांना शेती करता मजूर मिळेल असे झालेला असतानाही कशीबशी काढणी योग्य आलेली पिके या सततच्या होणाऱ्या पावसाने सडून गेली आहेत सदर पिकांचे नुकसान चे पंचनामे महसूल व कृषी विभागाने त्वरित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व विमा नुकसान भरपाई ही त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

 

——–कांदा रोपे सडली——–

शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नव्यानेच रब्बी पिकाच्या हंगामामध्ये कांदा लागवड करण्यासाठी रोपे तयार केलेली होती परंतु या सततच्या होणाऱ्या पावसाने कांदा रोपे सडून गेली आहेत.त्यामुळे पुन्हा नव्याने कांदा रोपे तयार करण्यासाठी प्रशासनाने १००% अनुदानवर बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये साठवलेला कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषचे वातावरण असतांना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून न निघणारे आहे.त्यातच कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित बाजार भावासह शेतकऱ्यांचे शेतातील झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे ते त्वरित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे.तसेच सध्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये साठवलेला कांदा यास बाजार भाव नसल्याने शेतकरी निर्माण झाला आहे त्यातच कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी व शेतकऱ्यांचे शेतातील झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे ते त्वरित करण्यात यावे अशी मागणी खेडलेझुंगे,कोळगाव, सारोळे थडी, धारणगाव वीर, रुई-धानोरे, धारणगाव खडक परिसरातील शेतकरी करत आहे.

परिसरामध्ये मागील पंधारवाड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणवर नुकसान झालेले आहे. मक्यासह सर्व पिकांचे नुकसान झालेले असल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

पंकज घोटेकर,शेतकरी
खेडलेझुंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *