धक्कादायक चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरून नेले
नाशिकरोड जवळील सामनगाव रोड येथील घटना
नाशिकरोड : प्रतिनिधी
एटीएम फोडता न आल्याने चोरट्यानी थेट एटीएमच उचलून चोरून नेल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड जवळील सामनगाव रोड परिसरात घडली. येथे आरपीएफ सेंटर असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली. एटीएम फोडता न आल्याने चोरट्यानी एटीएम च उचलून चोरून नेले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा त्यामध्ये एक पिकप व स्विफ्ट डिझायर गाडी या परिसरातून जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. दरम्यान या एटीएम मध्ये किती किती रक्कम होती याबाबत निश्चित आकडा समजू शकला नाही या घटनेची नाशिक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो परिणामी या संधीचा फायदा घेऊन सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले. सदरची घटना सकाळी नागरिकांना समजली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…