नाशिक

गणेशोत्सवासाठी बाजारात उत्साहाचे वातावरण

शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला

नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ सजली आहे. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी बालगोपाळांपासून सर्वच जण सज्ज झाले आहेत. सजावटीसाठी यंदा प्लास्टिक फुलांना बंदीं असली, तरी बाजारपेठ याफुलांनी सजली आहे. शहरातील मेनरोड, दहीपूल, कानडे मारुती लेनसह विविध भागांतील दुकाने, स्टॉल्सवर प्लास्टिक फुले, झाडे, माळा आदी विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. सलग सुट्टीची संधी साधून बाजारात गर्दी झाली होती.

येत्या दि. 27 ऑगस्टला श्रीगणेशाचे आगमन होणार असून, त्यापाठोपाठ गौराईचे आगमन होईल. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक आणि कृत्रिमफुले, लायटिंग आदी सजावटीच्या साहित्यांनी सुंदर रूप दिले जात आहे. हटके मखर, देखावा तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. पुढील आठवड्यात गर्दी वाढेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
श्रीगणेश बुद्धीची देवता आहे. 14 विद्या व 64 कलांचा अधिपती गणाधीशाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. गणपतीसाठी लागणार्‍या पूजेच्या वस्तूंसह सजावटीच्या इतर साहित्याने दुकाने, स्टॉल्स सजले आहेत. घरगुती, सार्वजनिक गणेशाच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण सजावट करण्याकडे कल असतो. बाजारपेठेत रंगीत प्लास्टिक फुलांच्या माळा, तोरणे, लटकन, नैवेद्याचे ताट, आंब्याच्या पानांचे तोरण, घुंगरू, कुंदन, घंटी, कार्निशियनची कापडी फुले, छोटी झाडे, कुंड्यांमध्ये लावलेली रंगीबिरंगी झाडे, हिरवा गालिचा, मोती कुंदनपासून बनविलेल्या पूजेच्या वस्तू, कलश, मोदक, लाइटवरील समई, दिवे, पडदे व मोरपीस आदी दहा रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विके्रत्यांनी
सांगितले.
मोदकाचे साचेही विक्रीस ठेवण्यात आले असून, उकडीच्या मोदकांची क्रेझ आहे. त्याचबरोबर पीव्हीसी पाइपचे मखर, चौकोन, गोलाकार, आयताकृती आकारात उपलब्ध करण्यात आले असून, त्यावर पैठणी, खण आदी वापरून मागचा पडदा साकारण्यासाठी उपलब्ध आहेत. लायटिंग, फोकस आदी 40 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बॅटरीवर चालणारे लाइट्स बच्चेकंपनीला पसंतीस उतरत असून, त्यांच्या किमती 15 रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यत
आहेत.
सजावटीच्या वस्तू कायमस्वरूपी किंवा एक-दोन गणेशोत्सव साजरा करण्यापर्यंत विकत घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे आपापल्या बजेटनुसार वस्तू खरेदी करण्यास ग्राहकांनी सुरुवात केली आहे. गणपतीपाठोपाठ ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार असल्याने त्यांच्या साच्यापासून ते फराळापर्यंत सर्व वस्तू विक्रीस उपलब्ध होत आहेत. सजावटीसह पूजेचे साहित्य, फळे-
फुलांची बाजारपेठही बहरत असल्याचे चित्र आहे.

Gavkari Admin

Recent Posts

वाजगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…

4 hours ago

संवर्ग एकमधील शिक्षक 100 टक्के नेमणुकीस नकार

जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…

4 hours ago

पीकविमा भरपाई न दिल्यास उपोषण

वंचित दोनशे शेतकर्‍यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…

5 hours ago

इच्छुक लागले तयारीला!

गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…

5 hours ago

जिल्ह्यात जुलैअखेर मलेरियाचे 28 रुग्ण

आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…

5 hours ago

इमारतीच्या गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाटली 1 कोटीची देयके

सिन्नर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा प्रताप; ठेकेदार आणि अधिकार्‍यांचे संगनमत सिन्नर : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत…

6 hours ago