एटीएसची नाशकात मोठी कारवाई
दहशतवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या युवकास अटक
नाशिक: प्रतिनिधी
दहशतवाद विरोधी पथकाने भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या आरोपाखाली एका उच्चशिक्षिताला अटक केली आहे. इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना मदत केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली. हुजेफ हुजैफ शेख (वय ३०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ताे उच्चशिक्षित असून आणि त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती आहे. शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथकं रवाना झाली आहेत. त्याला न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. त्याच्या घराच्या झडतीतून 7 मोबाईल फोन, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आलं आहे.
शेख इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आराेप सरकारी पक्षाने केला आहे. शहरात प्रथमच अशी घटना उघडकीस आली आहे. राबिया उर्फ उर्फ ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून हुसैफने पैसे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. पण कोर्टाने त्याला 7 दिवसांची म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेखवर आरोप आहे की, त्याने एका महिलेच्या सांगण्यावरून काही पैसे बँकेच्या माध्यमातून वळते केले. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यात बँक खाते आहेत आणि या राज्यात त्याचा संपर्क दिसतोय. बॅटल ऑफ बाबूस या २०१९ साली आयसिसच्या हल्ल्यात जे लोक दगावले, त्यांच्यावर जे लोक अवलंबून होते, त्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे. या संशयिताच्या महाराष्ट्रात काही कंपन्या आहे. यात agro, product संबंधी कंपन्या आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानच्या एका महिलेच्या सांगण्यावरून त्याने हे पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आलाय.
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…