दीड लाखांची लाच मागणाऱ्या
एटीएसच्या पोलिसावर गुन्हा दाखल
नाशिक: प्रतिनिधी
फायरिंगच्या गुन्ह्यात अटक न करण्याबरोबरच ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या भावाला सोडून देण्याच्या मोबदल्यात दोन लाखांची लाच मागून दीड लाख स्वीकारण्यची तयारी दर्शविलेल्या एटीएस च्या संदीप चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार याच्या भावाला फायरिंग च्या गुन्ह्यात एटीएस ने ताब्यात घेतले होते. त्यामुळे अटक न करता सोडून द्यावे म्हणून संदीप चव्हाण याने 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. दीड लाख रुपयांवर तडजोड होऊन ते स्वीकारण्याची तयारी चव्हाण याने दाखवली होती. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी श्रीमती गायत्री जाधव, मीरा आदमाणे, संदीप वणवे, ज्योती शार्दूल, परशराम जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, घारगे अपर अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत वाचक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…