केवल पार्क येथे 10–15 जणांचा कोयता, लाठी, लोखंडी पाईपने हल्ला; दोघे गंभीर जखमी, एकाला 15 टाके, उपचार सुरू
सातपूर: प्रतिनिधी
अंबड लिंकरोड येथील आझादनगर केवल पार्क परिसरात रस्त्याच्या वादातून दहा ते पंधरा जणांनी एकत्र येत धारदार शस्त्रांनी व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शफिक युनूस कुरेशी (वय ३०, व्यवसाय – भंगार गाडा) आणि युनूस युसूफ कुरेशी (वय ५१, रा. रामकृष्ण नगर, गट नंबर ७८, लिंक रोड, नाशिक) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
शफिक युनूस कुरेशी याला हल्ल्यात तब्बल १५ टाके पडले असून त्यांला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास केवल पार्क येथे घडली.
या ठिकाणी सुमारे ६०० वार क्षेत्रफळाच्या प्लॉटमधून रस्ता मागणीवरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. हल्लेखोरांनी कोयता, लाठी, लोखंडी पाईप तसेच दगडांचा वापर करत दोघांवर प्राणघातक हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास सुरू आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…