रुग्णालयातून बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला.. तरुणाला नागरिकांनी दिला चोप

मनमाड: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना ताजी असतानाच  पुन्हा अशीच घटना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घडली असून आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला डोस देण्यासाठी आलेल्या महिलेच्या तीन वर्षीय मुलीला अपहरण करून घेऊन जात असतानाच नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. नागरीकांनी चिमुकलीला नराधमांच्या तावडीतून सुटका करुन त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत आरोपीला अटक केली व अपहरण करण्या मागचा उद्देश काय याशिवाय स्थानिक पातळीवर त्याला कोणी मदत करत होते का .? या सगळ्या गोष्टींचा तपास करत आहे.

नगर परिषदेतील सफाई कर्मचारी प्रवीण निकाळे यांची पत्नी छाया निकाळे नऊ महिन्याच्या मुलाला नियमित लस देण्यासाठी उपजिल्हा रुगणालयात गेली होती सोबत त्यांची आई आणि तीन वर्षाची चिमुकली देखील होती.खेळता खेळता चिमुकली रुग्णालयाच्या बाहेर आली होती हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती याचा फायदा घेत एका तरुणाने या मुलीला उचलून घेऊन जात असताना तिने रडायला सुरुवात केली ते पाहून उपस्थित लोकांना संशय आला आणि त्यांनी या तरुणाची विचारपूस केली मात्र तो उडवा उडवीचे उत्तर देत होता तेवढ्यात मुलीला शोधत तिची आई आली तिला पाहून मुलीने तिला हाक मारली आणि तिच्या जवळ पळत गेली हे सर्व पाहून हा या तरुणाने चिमुकलीचे अपहरण करत होता हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले, जय पुरुषोत्तम वैराळे राहणार शिवर तालुका जिल्हा अकोला
असे आरोपीचे नाव असुन पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे,काही दिवसा पूर्वी सिकंदर नगर भागात असाच प्रकार घडला होता त्यावेळी देखील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पांच वर्षीय मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला होता आज देखील नागरिकांच्या जागरूकते मुळे एका तीन वर्षीय चिमुकली सुखरूप तिच्या पालकांच्या कुशीत गेली.नागरिकांनी या तरुणाला पकडल्यानंतर तू मुलीला घेऊन कुठे जात होता तेंव्हा मला आम्हाला लहान मुलगी आणून दे आम्ही तुला 10 लाख रुपये देऊ असे या तरुणाने सांगितले..हा तरून खर बोलतोय कि ? खोट ? जर खरे बोलत असेल तर मग तो कोणाला ही मुलगी देणार होता याचा उलगडा पोलिसांच्या तपासात होईल एवढ मात्र नक्की कि अवघ्या एक महिन्याच्या आत दोन लहान मुलींचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे अपहरण करणारी टोळी सक्रीय तर झाली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे पालकानो तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्याकडे जास्त आणि बारीक लक्ष ठेवा असे आवाहन करण्यात येत आहे

अपहरणाला स्थानिकांची मदत आहे काय..?
एक महिन्याच्या आत दोन लहान मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला मात्र स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने हा प्रकार टळला असला तरी जे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला यात आरोपींने मला दहा लाख रुपये मिळणार होते हे सांगितले असले तरी माझ्यासोबत स्थानिक एकजण होता हेही सांगितले आहे यामुळे या अपहरण प्रकरणात स्थानिक गुन्हेगारी स्वरूपात असलेली व्यक्ती सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी कसुन चौकशी करून सदर स्थानिक आरोपींचा पर्दाफाश करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.


तीन वर्षीय मुलीचे अपहरण करणारा संशयित आरोपी जय वैराळे(छाया:  आमिन शेख)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *