२९ वर्षीय युवकाच्या खुनाचा प्रयत्न,युवक गंभीर जखमी

२९ वर्षीय युवकाच्या खुनाचा प्रयत्न,युवक गंभीर जखमी

लासलगाव प्रतिनिधी

खेडलेझुंगे येथील सोमठाणे त्रिफुली येथे दि.१ जुलै सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कृष्णा उर्फ किशोर रामभाऊ धोक्रट, वय २९ वर्ष, रा. सोमठाणे याच्यावर ७ युवकांनी हल्ला करीत गंभीर जखमी केले असून त्याची प्रकृती गंभीर असून याबाबत आरोपींच्या विरोधात काल लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत फिर्यादी संतोष रामभाऊ धोक्रट वय ३२ सोमठाणे ता.सिन्नर यांनी आपल्या फिर्यादीत, सचिन गोविंद कोकाटे, रा.सोमठाणे ता.सिन्नर, राहुल उर्फ डोम्या सुभाष आहेर, विकास उर्फ विकी सोमनाथ गायकवाड व इतर अनोळखी ४ इसम यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीचा भाऊ कृष्णा उर्फ किशोर रामभाऊ धोक्रट यास फिर्यादीची भाची व तिच्या पतीच्या झालेल्या वादाचे कारणावरुन आरोपी सचिन कोकाटे याने कट कारस्थान करुन गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी राहुल आहेर याने हातातील कोयत्याने कृष्णा धोक्रट याचे पोटावर, खांद्यावर वार करुन आपखुशीने गंभीर दुखापत केली तसेच आरोपी विकास गायकवाड याने हातातील लाकडी काठीने कृष्णा याचे डोक्यावर, कानाजवळ जोरात मारुन दुखापत केली.

इतर चार अनोळखी आरोपींपैकी एकाने राहुल आहेर याचे हातातील कोयता घेवुन जखमी कृष्णा याचे डोक्यात मारला व इतर तीन अनोळखी इसमांनी कृष्णास लाथा बुक्यांनी मारहाण करुन तेथून पळुन गेले अशी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रजि.न.१६८/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०९,१८९(२), १८९(४),१९१(२),१९१( ३),१९०,६१(२ ) (अ),११८(१)३५२,३५१(२) (३),३५१(४) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पालवे, सपोनि भास्कर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

3 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

3 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

3 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

3 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

3 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

3 hours ago