पपया नर्सरी येथे ऑडी गाडीला आग; पुढील भाग जळून खाक
सिडको विशेष प्रतिनिधी :-सातपुर परिसरातील पपया नर्सरीजवळ शनीवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान एका ऑडी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत गाडीचा पुढील बोनेटचा भाग पूर्णतः जळून खाक झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ऑडी गाडी पपया नर्सरीजवळ रस्त्यावरुन जात असताना अचानक तिच्या इंजिन भागातून धूर येऊ लागला. काही क्षणांतच गाडीने पेट घेतला. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
गाडीचा पुढील भाग आगीत पूर्णतः जळून गेलेला असून, गाडी मालकाच्या म्हणण्यानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.