लासलगाव : प्रतिनिधी
उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने दारूचा सुळसुळाट सुरू असून देवगाव येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या मोटारसायकलने माजी सरपंचाच्या मुलाला उडवले तर या घटनेत पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचले आहे.या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध जोरदार मोहीम हाती घेत कारवाई सुरू असून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दोन दिवसापूर्वीच अवैध धंद्याविरुद्ध बैठक घेऊन पोलीस पाटील यांना सूचना दिल्या होत्या मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचे या घटनेवरून निष्पन्न होत आहे.एकीकडे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अवैध धंदे व दारू विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतरही पोलीस पाटील आणि अवैध धंद्यावाल्यांनी केराची टोपली दाखवल्याचे या घटनेवरून दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे.अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरघाव मोटरसायकलने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र धनंजय जोशी यांना उडवले.या धडकेत चार- पाच युवक ही वाचले.सदर घटनेची बातमी गावात कळताच शेकडो संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरच ठिय्या मांडला.जोपर्यंत गावात व परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा कडक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली यानंतर लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दोन दिवसापूर्वीच अवैध धंद्याविरुद्ध बैठक घेऊन पोलीसपाटील यांना सूचना दिल्या असतांना देवगाव परिसरामध्ये अजूनही अवैध दारू विक्री सर्रास पणे सुरू असून या अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरघाव मोटरसायकलने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या धनंजय जोशी यांना जोरदार धडक मारल्याची घटना घडल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.या घटनेची माहिती सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळवताच तात्काळ स.पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ऊ. नि लहानु धोक्रेट, पोलीस नाईक संदिप शिंदे,औदुंबर मुरडनर,गणेश बागुल यांनी देवगावला भेट देत अवैध धंद्यावर धाड टाकली व मुद्देमाल जप्त केला.सुखदेव सोमनाथ कापसे व दादा देवराम कापसे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये तर दत्तू सुभाष पिंपळे याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.असून ३९२० रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली आहे. कारवाई नंतर संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मागे घेतला.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…