सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि.9) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली.
शेतातील कांदा आणि इतर शेतमाल झाकण्यासाठी शेतकर्यांची धावपळ उडाली.
सिन्नर शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वारा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे शहराच्या गल्लीबोळांत विविध ठिकाणी पाणी साचले होते.
साचलेल्या पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मार्ग काढावा लागला.
दरम्यान, तालुक्याच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली.