नाशिक

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पाठ; सरकारी कार्यालयांना नोटिसा

मोठ्या सोसायट्यांवरही कारवाई; महापालिका आक्रमक

नाशिक : प्रतिनिधी

वारंवार सूचना देऊनही सरकारी कार्यालये आणि मोठ्या सोसायट्या रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे गंभीर चित्र नाशिकमध्ये आहे. यावर महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारी कार्यालयांना नोटिसा बजावण्याचे आदेश मनपा अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी दिले आहेत. यामुळे आता सरकारी कार्यालयांसह मोठ्या सोसायट्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

गोदावरी संवर्धन उपसमितीच्या बैठकीत निर्णय

मनपातील स्थायी समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि. 18) अतिरिक्त आयुक्त नायर यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी संवर्धन उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे सरकारी कार्यालयांसह मोठ्या सोसायट्या दुर्लक्ष करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीला उपायुक्त अजित निकत, शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, सुनील पेंढेकर, चंद्रकांत पाटील, मनोज साठे, रोशन केदार, अपर्णा कोठावळे, नीलेश झंवर आदी उपस्थित होते.

कार्यालयांना 15 दिवसांत नोटीस

महापालिका प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. सर्व शासकीय कार्यालयांंना 15 दिवसांत नोटिसा पाठविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. नोटिशीत रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था त्वरित उभारावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून मनपा प्रशासनाने अनेकदा सूचना दिल्या होत्या, पण कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे तपासणीत आढळले आहे.

मोठ्या सोसायट्यांचीही तपासणी

शहरातील मोठ्या सोसायट्या आणि टाउनशिप याठिकाणीही पथके पाठवून रेन वॉटर हार्वेस्टिंग होते की नाही, याची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार दहा हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या इमारतींना आणि सर्व सार्वजनिक इमारतींना रेन हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, मनपाच्या सर्वेक्षणात अनेक सरकारी कार्यालयांनी अद्याप अंमलबजावणी न केल्याचे आढळले आहे.

मनपा आस्थापनांचाही समावेश

सर्वेक्षणात रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी न केलेल्यांमध्ये मनपा आस्थापनांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नायर यांनी बांधकाम व मालमत्ता विभागांना निर्देश दिले असून, संबंधित कार्यालयांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

17 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

19 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

20 hours ago