नाशिक:- लातूर येथे नुकत्याच झालेल्या बुजुर्गांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतच नाशिकच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली. डॉ. राजेंद्र जाधव आणि मिलिंद वडाळकर (धुळे) यांनी ६० वर्षे वयोगटात उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतीत त्यांची झुंज अपयशी ठरली.
नाशिकमधून राणा मनिंदर आणि मनोज शिंदे यांनी ५० वर्षे वयोगटात दुहेरीत तसेच मनीषा सूर्यवंशी यांनी ४० वर्षे वयोगटात मिश्र दुहेरीमध्ये नाशिकचे प्रतिनिधीत्व केले. ६० वर्षे वयोगटात डॉ. जाधव आणि वडाळकर यांचा दुहेरीच्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या भरत पाटील आणि सुरेश मिरगल यांच्याकडून पराभव पत्करला. एकेरीत डॉ. जाधव यांनी दुसरी फेरी गाठली होती. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी (कोचिंग) राजन पिलाई (नाशिक) यांचीही यावेळी उपस्थिती होती.
दयानंद विधी महाविद्यालय, लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटना यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या योनेक्स योनेक्स सनराइज् स्वर्गीय जी के खुबा मेमोरियल बुजूर्ग राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेची मान्यता लाभली.
महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना मान्यताप्राप्त या स्पर्धेचे आयोजन दयानंद विधी महाविद्यालय तसेच संयोजक लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटना तसेच संघटन सेक्रेटरी आशिष बाजपेयी यांच्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २५० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. त्यात मुंबई, ठाणे, मुलुंड, रायगड, पुणे ,सोलापूर, नागपूर ,नाशिक, जळगाव, धुळे येथील स्पर्धकांचा समावेश होता. ३५ ते ६५ वयोगटापर्यंत पुरुष व महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा एकूण २५ विभागांत सामने ७ ते १० मे दरम्यान सामने झाले.
स्पर्धेचे काही निकाल
३५+ वयोगट पुरुष एकेरी विजेता – निघेल डिसा. ३५+ वयोगट महिला एकेरी विजेती – भाग्यलक्ष्मी कुलकर्णी. ६५+ वयोगट पुरुष दुहेरी विजेता – लोराय डिसा व शौकत मोहम्मद.
यापुढे होणार्या स्पर्धामध्षे नाशिकच्या बुजूर्ग खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास खेळाडू म्हणून रीतसर नोंदणी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडे नोंदणी होत असते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व नाशिक बॅडमिंटन असोसिएशनकडेही नोंदणी होते. उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पर्यंत मानांकनही मिळू शकते,अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…
प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…
एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…