नाशिक

बाळासाहेब वाघ यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे

बाळासाहेब वाघ यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे
आ. बाळासाहेब थोरात : जयंती सोहळ्यात आठवणींनी उजाळा
नाशिक : प्रतिनिधी
बाळासाहेब वाघ यांना  कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या विचारांचा वारसा लाभला. या विचारातून त्यांनी आयुष्यभर दीपस्तंभाप्रमाणे काम उभे केले. पुरोगामी विचारांची पिढी म्हणून कर्मवीर काकासाहेब वाघ यांना ओळखले  जाते. त्याचप्रमाणे बाळासाहेब वाघ यांना कर्मयोगी ही उपाधी देत त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशा भावना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या.
के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माईल व स्पिनॅच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने के. के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचा जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होतेे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे,  भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, स्माईल व स्पिनॅचचे सचिव अजिंक्य वाघ, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार डॉ. सुधीर तांबे,  आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे,  माजी आमदार अनिल कदम, संस्थेचे विश्वस्त मंडळ, सचिव प्रा. के एस बंदी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते.  प्राचार्य डॉ. के एन नांदुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आणि कृषी व कृषी संलग्न या तिन्ही महाविद्यालयांच्या असोसिएशनच्या वतीने  बाळासाहेब वाघ यांचे नावे सर्वोत्तम संस्था, सर्वोत्तम प्राचार्य, सर्वोत्तम शिक्षक व जीवनगौरव पुरस्कार यांची घोषणा केली.  संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला .
राजेश टोपे म्हणाले की, गेल्या वर्षी बाळासाहेब यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आज त्यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीने बाळासाहेब वाघ यांच्या विचारांचा वारसा चालवला पाहिजे हीच खरी भाऊंना आदरांजली ठरेल. सध्या शिक्षणात गुणवत्ता टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. हे आव्हान के के वाघ शिक्षण संस्थेने बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाने लिलयास पेलले.
बाळासाहेब वाघ यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम पाहता के के वाघ शिक्षण संस्थेने बाळासाहेब वाघ यांच्या  नावे विद्यापीठ सुरु करावे अशी भावना कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यातही संस्थेच्या पाठीशी सदैव उभा राहील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, डॉ. सुधीर तांबे,  दिलीप बनकर, सीमा हिरे व माजी कुलगुरु डॉ. शंकरराव मगर यांनी  कै. बाळासाहेब वाघ यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. शंकरराव मगर लिखित  कृषी क्रांतीचे योगिराज व ब.ना. कुंभार गुरुजी  लिखित अशुद्ध लेखन शुद्ध कसे करावे या  दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पवार व प्रा. जाग़ती निकम यांनी केले. आभार अजिंक्य वाघ यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago