नाशकात ड्रोन उडविण्यास बंदी

पोलिस आयुक्तालयाकडून आदेश जारी

नाशिक : प्रतिनिधी
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलीस आयुक्तालयाने ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ जारी केला आहे. दहशतवादी हल्ल्यांचा संशय व शक्यता लक्षात घेता यासंदर्भातील आदेश काल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जारी केले आहेत. 31 मेपर्यंत हे आदेश लागू राहणार असून, कुणालाही परवानगीशिवाय ड्रोन उडविता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाने सन 2022 मध्ये आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख संवेदनशील ठिकाणांची यादी घोषित केली असून, यामध्ये पोलिस, सैन्य दल, एअर फोर्ससह प्रेस आणि मंदिरांचा समावेश आहे. या परिसरासह शहरात सर्वत्र ड्रोनसह फ्लाइंग साधने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोरोना कालावधीत महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आवारात विनापरवानगी ड्रोन उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पोलिस यंत्रणेने अधिक सतर्क होत तपास केला. तेव्हापासून ड्रोन वापराच्या निर्बंधांत अधिक वाढ केली आहे. आता दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सन 2022 पासून नव्याने प्रतिबंधित निर्णय जाहीर झाले आहेत. त्यानुसार आता पुन्हा आदेशात सुधारणा करुन प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

अशी आहे मनाई

शहराच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून,

मायक्रोलाइट व एअरक्राफ्टला संवेदनशील क्षेत्रात मनाई आहे.

यासह इतर भागात ड्रोन वापरायचा असेल,

तर आयुक्तालयाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.

त्यासाठी ड्रोनचालक-मालकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाची माहिती अर्जात द्यावी लागणार आहे.

दिनांक, वेळ, ड्रोनची माहिती, ऑपरेटरचे नाव आणि पत्ता, संपर्क क्रमांक,

प्रशिक्षणाची छायांकित प्रत अर्जास जोडण्याचे निर्देश आयुक्तालयाने दिले आहेत.

दरम्यान, ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’, ‘डीआरडीओ’, ‘एचएएल’ या लष्करी यंत्रणांमुळे

नाशिकमध्ये युद्ध सरावापासून लढाऊ विमानांची निर्मिती होत असल्याने

नाशिकला अधिक सतर्कता घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *