आस्वाद

बांगलादेशी नकली सोने (रेड गोल्ड)

भारतात सोन्याच्या किमती मार्च 2026 मध्ये ऐतिहासिक उच्चांकावर प्रति ग्रॅम 15,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचल्या असताना, बाजारात एका धोकादायक नकली धातूचे जाळे वेगाने पसरत आहे. बांगलादेशी रेड गोल्ड किंवाAka Stone या नावाने ओळखल्या जाणार्‍या या बनावट धातूने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडिओंमध्ये हे सोने वितळवताना, कापताना आणि चाचणी करताना दाखवले जाते आणि बहुतांश वेळा ते खर्‍या सोन्यासारखेच दिसते. अनुभवी सोनार, बँक अधिकारी, अगदी सरकारी तारण मूल्यांकनकर्तेही या फसवणुकीला बळी पडत आहेत.

Aka Stone / Red Gold म्हणजे काय?
Red Gold हे कोणत्याही नैसर्गिक खाणीतून निघालेले सोने नाही. हा एक प्रयोगशाळेत तयार केलेला, अत्यंत प्रगत धातू-मिश्र पदार्थ(engineered metal alloy) आहे. त्याचे मूळ घटक आहेत- तांबे, निकेल, जस्त, आणि काही वेळा टंगस्टन. हे सर्व स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले धातू आहेत – पण एकत्र मिसळल्यावर त्यांचा परिणाम आश्चर्यकारक असतो. या मिश्रणाची सर्वांत धोकादायक बाजू म्हणजे हे धातू सोन्यासारखेच कापले आणि वितळवले जाऊ शकते. वितळवल्यानंतरही सोनेरी रंग कायम राहतो. स्क्रॅच केल्यावर आत वेगळ्या रंगाची परत दिसत नाही, कारण हे मिश्रण आतपर्यंत एकसारखे असते – साध्या सोनेरी थराखाली वेगळा धातू लपवलेला नसतो.
फसवणुकीची पद्धत – घोटाळे कसे होतात?
या घोटाळ्यांमध्ये एक ठराविक पॅटर्न आढळतो.
1) पहिली पायरी म्हणजे विश्वास संपादन करणे. सोशल मीडिया, ओळखीचे लोक किंवा थेट संपर्काद्वारे बांगलादेशातून खूप स्वस्तात सोने मिळवता येते असे आमिष दाखवले जाते.
2) दुसरी पायरी म्हणजे खरे नमुने दाखवणे. पहिल्या व्यवहारात किंवा नमुन्यासाठी खरे सोने दिले जाते. पीडित ते तपासतो – ते खरे निघते. विश्वास दृढ होतो.
3) तिसरी पायरी म्हणजे मोठ्या खरेदीचे आमिष. एकदाच संधी आहे, घाई कर, माल लवकर संपेल असा दबाव टाकला जातो.
4) चौथी पायरी म्हणजे बदलाबदल – – Switching. मोठी रक्कम घेतल्यावर पॅकेजमधून किंवा बोटांच्या चपळाईने Aka Stone दिले जाते.
5) पाचवी पायरी म्हणजे गायब होणे. आरोपी पटकन स्थान बदलतात. पीडित तक्रार करेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
वर्धा, जानेवारी 2026
कपडा व्यापार्‍याला प्रथम खर्‍या सोन्याचा नमुना दिला. विश्वास बसल्यावर त्याने 2 किलो सोन्याची मागणी केली आणि 10 लाख रुपये दिले. मिळालेला संपूर्ण माल Aka Stone होता. आरोपी पसार झाले आणि तिघांवर FIR नोंद झाली.
कोलकाता कनेक्शन-
बांगलादेश ते महाराष्ट्र
पोलीस तपासात एक महत्त्वाचे सूत्र समोर आले आहे. या घोटाळ्यांचा धागा कोलकाताच्या बौबाजार सोनापट्टी परिसराशी जोडलेला आहे. कोलकाता पोलिसांनी उघड केलेल्या एका प्रकरणात, कोलकाताच्या एका सोनाराची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाली. त्याने टोळीला खर्‍या सोन्याचे दागिने दिले आणि बदल्यात मिळाले ते बनावट सोन्याचे बिस्कीट- ज्यापैकी सात किलोहून अधिक माल जप्त करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता.
13 मार्च 2026 रोजी वाराणसी कॅन्ट रेल्वे स्थानकावर GRP-RPF च्या संयुक्त पथकाने महाराष्ट्राच्या दोन तस्करांना पकडले. सतारा व पुण्याचे हे दोघे डिब्रुगढ राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यांच्याकडून पश्चिम बंगालच्या कूचबिहारमार्गे बांगलादेशातून आणलेले सुमारे 2.215 किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे 3.54 कोटी रुपये आहे.

Red Gold  कसे ओळखाल
रंग थोडा लाल-केशरी छटा असू शकतो. खूप दिवसांनी त्वचेवर हिरवा किंवा काळा डाग येऊ शकतो. किंमत बाजारभावापेक्षा खूपच कमी असते. मार्च 2026 मध्ये खरे 22घ सोने सुमारे 14,970/ग्रॅम असताना रेड स्टोन 90 मध्ये मिळणे अशक्य आहे. इखड हॉलमार्क नसतो किंवा बनावट असतो.

सुरक्षित सोने खरेदीचे नियम
BIS नोंदणीकृत सराफाकडूनच नेहमी खरेदी करा. दागिन्यावरील HUID क्रमांक BIS C-RE App da verify करा. शंका असल्यास BIS मान्यताप्राप्त AHC केंद्रात XRF चाचणी करवा. बिल आणि गॅरंटी कार्ड सक्तीने घ्या. पेमेंट बँक ट्रान्सफरने करा. रोख व्यवहार टाळा.

तक्रार कुठे कराल?
BIS C-RE App-HUID verify करण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन- 1800-11-4000 (मोफत). ऑनलाइन तक्रार- edaakhil.nic.in. अधिकृत माहिती- bis.gov.in. स्थानिक पोलीस ठाण्यात FIR नोंदवा.

नेमके आहे तरी काय?

या मिश्रणाचा तपशील असा
तांबे 50 ते 70% – सोनेरी-लाल रंग देतो. संपूर्ण
धातूत एकसारखा रंग राखतो.

निकेल 15 ते 25% – गंज प्रतिरोधकता वाढवतो. चमक टिकवण्यास मदत करतो.

  जस्त 5 ते 15% – मजबुती देतो.
पितळासारखी रचना तयार होते.

टंगस्टन- याची घनता सोन्याइतकीच (19.3 स/लाख) असते. त्यामुळे वजन चाचणीत फसवले जाते.

सोने- शून्य ते नगण्य.
वास्तविक मूल्य अजिबात नाही.

 

Bangladeshi fake gold (red gold)

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

4 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

4 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago