नाशिक – पेठ रस्त्यावर अपघातात बापलेकीचा दुर्दैवी अंत

 

दिंडोरी : प्रतिनिधी

नाशिक-पेठ रस्त्यावरील चाचडगाव शिवारातील हॉटेल गंगासागरसमोर छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापलेकीचा अंत झाल्याने छोटा हत्ती चालकाविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी सोमनाथ पोपट गांगुडे (रा. उगाव, ता. निफाड) याने त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एमएच १५ – जीसी ०३५६ चालवत नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर चाचाडगाव शिवारात भरधाव वेगात मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रस्त्याच्या उजव्या बाजूला वळतेवेळी एमएच १५ – सीपी ०८६६ या क्रमांकाची मोटारसायकल त्याच सुमारास तेथून जात होती. छोटा हत्तीने या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुनील लक्ष्मण सापटे वय २६ व मागे बसलेली नंदा सुनील सापटे वय ८ या दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयतांच्या मृत्यूस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याची फिर्याद लक्ष्मण काशीराम सापटे वय ५२, राहणार एकदरे पोस्ट ऊसतळे तालुका पेठ यांनी दिल्याने दिंडोरी पोलिसांनी सोमनाथ गांगुर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *