लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज

आर्टीफिशिअल हिरवळ दाटली चोहीकडे

नाशिक ः देवयानी सोनार

विद्येची देवता असलेल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. काल बाजारात गणेश मूर्ती खरेदीबरोबरच सजावटीच्या साहित्याची खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. आर्टीङ्गिशिअल हिरवळीचा मोठा ट्रेंन्ड आल्याने खरेदीसाठी पसंती दिसून आली.
गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.गणरायाच्या आगमनाची जल्लोषात तयारी सुरु असून कोरोनानंतरच्या निर्बधमुक्त वातावरणात दणक्यात साजरा करण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत.
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ही बालकवींची कविता श्रावणातील वर्णन यथोचित करणारी आहे. श्रावण संपून भाद्रपदास प्रारंभ होत आहे.भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची लगबग सुरू होते. लाडक्या बाप्पाला आणि स्थापनेच्या जागेला सुशोभित करण्यासाठी विविध सृजनात्मक निर्मिती करून सजावट केली जाते.
गणरायाच्या स्थापनेच्या जागेवर सध्या आर्टीङ्गिशिअल हिरवळीचा वापर करण्यात येत आहे.जागेच्या उपलब्धतेनुसार आणि सजावटीनुसार हव्या त्या मापात आर्टीङ्गिशिअल हिरवळ नग किंवा मीटरवर मिळत असल्याने ग्राहकांची पसंती आहे.
सजावटीला जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साहित्य खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असल्याने कागदी ङ्गुले ङ्गळे,कार्डबोर्ड,गणेशमूर्ती आणि सजावट,पूजा साहित्यांचे स्टॉल्स् बाजारात लागले आहे.शहरातील कानडे मारूती लेन,भद्रकाली,पंचवटी,शालीमार,कॉलेजरोड,नाशिकरोड,सिडको सातपूर येथे आर्टीङ्गिशिअल हिरवळ ,पाने, ङ्गुले,आसन,शेला आदी साहित्यांचे स्टॉल्स् लागले आहे.
ढोल वाजणार!
दोन वर्षानंतर ढोल पथकांचा बसलेला आवाज आसमंत दुमदुमवणार आहे.त्यासाठी शहरातील विविध ढोल वादक प्रमुखांनी सराव शिबिरे घेतली आहेत.ढोलपथक,झांजपथक लेझीम,बँड,हलगी ढोलताशा,पावरी आदी वाद्ये आणि पथकांना मागणी आहे.
गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचा आनंद यंदा नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
मखर,कलाकुसरीच्या वस्तुंना अच्छे दिन
पर्यावरणपूरक मखर,कलाकुसरीच्या वस्तुंना चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.कापड,चमकी,टिकली,पॅचवर्क,कार्डबोर्ड,प्लास्टिक पाईप, जुने पेपर,क्रेप, घोटीव कागद आदींपासून बनविलेल्या मखरांना मागणी आहे,
मोदकांची विविधता
उकडीच्या मोदकांपासून ते ड्रायफूट,चॉकलेट मोदकांपर्यंत विविध प्रकार आणि चवीच्या मोदकांची क्रेझ दिसून येत आहे.उकडीचे,पान,चॉकलेट,तळलेले,पेढ्यांपासून बनविलेले,ड्रायङ्ग्रुट,केशरयुक्त,गुळखोबर्‍याचेअसे अनेक प्रकार उपलब्ध असून ऑनलाइन उकडीच्या मोदकांना मागणी असून अकरा,एकवीस मोदकांसाठी अंतर आणि गुणवत्तेनुसार दर आहेत.
इंडियन लायटींगचा झगमगाट
गणपती सजावटीसाठी लायटींग करण्यात येते.मोठमोठ्या मंडळांपासून ते घरगुती सजावटीत लायटींगचा वापर करण्यात येतो.गेल्या दोन तीन वर्षांपासून इंडियन लायंटींगला पसंती मिळत आहे. लायटींगचे विविध प्रकार पणत्या,हनीबी,एलइडी बल्प,गोटी,ङ्गुलपाखरु तसेच प्लेन लायटींग लाल,हिरव्या,पिवळ्या,निळ्या रंगात उपलब्ध असून विविध आकारांचे तोरण,झुंबर आदींना मागणी असल्याचे चित्र आहे.
आज घरोघरी लाडका बाप्पा विराजमान होणार असून, पुढील दहा दिवस मंगलमय वातावरणाची अनुभूती येणार आहे. त्यामुळे भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

12 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

12 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

23 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

1 day ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

1 day ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

1 day ago