वलखेड फाट्यावर अपघातात करंजवणचे बर्डे दांपत्य ठार

वलखेड फाट्यावर अपघातात करंजवणचे बर्डे दांपत्य ठार

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी – वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये पती -पत्नी जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाले आहे. जखमी मुलीला तातडीने खाजगी रुग्णालयात करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील वजन काट्यासमोर कार क्रमांक (एमएच 01 डीवाय 0691) व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांंक (एमएच 05 एफ.जे 8188) यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे (43) , पत्नी सुरेखा सतीश बर्डे (40) व मुलगी समृध्दी सतीश बर्डे (17) हे तिघे कारव्दारे निळवंडी येथून नातेवाईकाकडून आपल्या करंजवण गावी परतत असतांना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरुन येणारी आयशरशी धडक होत त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिक येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती -पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगी समृध्दी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहे. यावेळी करंजवण येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

करंजवण गावावर शोककळा
करंजवण येथे सतीश बर्डे दांपत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. करंजवण येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकाने बंद ठेवली. आपले दैनदिन व्यवहार बंद केले. त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोकाकला पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *