बागलाण तालुक्यात बर्निंग बसचा थरार
नाशिक : प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील खिरमणी फाट्यावर एसटी महामंडळ च्या बसला आग लागली, बस मध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र आग लागताच प्रवाशांनी बस बाहेर धाव घेतल्याने प्रवासी बचावले, सटाणा-प्रतापूर या मार्गावर धावणारी ही बस होती. खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण ३0 ते ४० प्रवाशी होते. बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले.
बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्यानंतर सटाणा येथून अग्निशामक दलाचे जवान तातडीने आग विझविण्यासाठी दाखल झाले. पण, तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
पहा व्हीडिओ