मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग
नाशिक: प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या आदीमा ऑरगॅनिक कंपनीला आज दुपारी आग लागली, आगीने मोठे रूप धारण केले असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी सिन्नर नगरपालिकेचे बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत, आगीचे कारण समजू शकले नाही,
उपाययोजना करण्याच्या सूचना
मुसळगाव सिन्नर द्रुतगती मार्गावरील आदिमा ऑरगॅनिक केमिकल बनवणारी कंपनीला दुपारी 4 वाजता आग लागल्याचे समजताच संबंधित यंत्रणेशी संवाद साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केली आहे. प्राथमिक माहिती नुसार साधारण 20 ते 25 कर्मचाऱ्यांची कंपनी असून कामावर आज रोजी 10 ते 12 कर्मचारी हजर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या पोहचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलिस, महसूल तसेच वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्वोतोपरी मदत याठिकाणी शासकीय पातळीवरून सुरू आहे. घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
– दादाजी भुसे , पालकमंत्री नाशिक