नाशिक-वणी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

नाशिक-वणी रस्त्यावर गाडीने घेतला अचानक पेट

दिंडोरी :  अशोक केंग
दिंडोरी तालुक्यातील नाशिक-वणी महामार्गावर आज दुपारी  दरम्यान वणीकडे जाणाऱ्या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवांने जीवीतहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार योगेश प्रकाश गिरासे  राहाणार होडनाथे ता.शिरपूर जि.धुळे   महेंद्रा लोगन गाडी नंबर एमएच-१५,सीटी ६३३३या गाडीने नाशिकहुन वणी गडावरील देवीच्या दर्शनासाठी जात असताना दिंडोरी जवळली वनारवाडी फाट्याजवळ गाडी घेऊन आलो असताना गाडीत जळण्याचा वास येऊ लागल्याने गाडी चालक योगेश गिरासे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेत गाडीचा बोनट उघडताच त्यातून धुर निघतांना दिसला.नंतर धुराचे रूपांतर हळूहळू आगीमध्ये होऊ लागले.  आगीने अचानक प्रचंड पेट घेतल्याने आजु बाजुला नागरिक उपस्थित होते.त्या सर्व जमलेल्या नागरिकांनी व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस हवालदार मुंढे इ. यांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु नागरिकांना   यश आले नाही.  बघता बघता गाडी पुर्णपणे जळून खाक झाली.  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र या अपघातांत जीवीत हानी टळल्याने उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरूण आव्हाड ,पोलीस हवालदार मुंढे,हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *