नाशिक-पुणे महामार्गावर 600 किलो गोमांस जप्त
वावी पोलिसांची कारवाई
सिन्नर: प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावर वावी पोलीस स्टेशन हद्दीत
शनिवारी पहाटे साडे तीन च्या सुमारास सुमारे ६०० किलो गोमांस पकडण्यात वावी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे….
याबाबत अधिक माहिती अशी की, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत संगमनेर येथून मुंबईच्या दिशेने समृध्दी हायवे रोडने मारुती सुझुकी कार क्र. एमएच ०४ इडी ७९५९ मधून अवैधरित्या जनावरांचे मास जाणार असल्याची माहिती मिळाली.
लोखंडे यांनी तात्काळ गस्त लाऊन समृध्दी महामार्ग जवळ गोंदे फाटा येथील टोलनाक्याच्या अलीकडे समृध्दी महामार्गावर चढणाऱ्या रोडवर नाकाबंदी केली. यानंतर राखाडी रंगाची मारुती सुझुकी कंपनीची गाडी ताब्यात घेत तपासणी केली असता या गाडीच्या पाठीमागील सिटवर व डिक्कीत काळ्या रंगाच्या प्लास्टीकखाली गोमांस आढळून आले.
पोलिसांनी गोमांससह जवळ पास तीन लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित अझरुद्दीन जमालुद्दीन शेख (२७), अहसान मोहम्मद कुरेशी (२२) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जगताप, प्रवीण अढांगळे, भास्कर जाधव, एन. सी. मैंद, शैलेश शेलार, रत्नाकर तांबे आदींनी ही कारवाई केली.