मिश्र त्वचेसाठी रुटीन
सकाळची काळजी : मिश्र त्वचेमध्ये टी झोन तेलकट आणि बाकी भाग कोरडा असतो. त्यामुळे सकाळी बालन्स्ड फेसवॉश वापरावा. नंतर गुलाबजल + ग्रीन टीयुक्त टोनर वापरला तरी चालतो. टी झोनसाठी जेल बेस्ड आणि बाकी भागासाठी हलकं क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरावा. सनस्क्रीन ही नॉन-कॉमेडोजेनिक असावी.
रात्री दोन्ही भागांची वेगवेगळी काळजी घ्या. नायसिनामाइड आणि हायलुरॉनिक यांचे कॉम्बो सिरम वापरू शकता. टी-झोनसाठी लाइट जेल आणि गालांसाठी हायड्रेटिंग क्रीम वापरा. हे त्वचेला संतुलन राखण्यास मदत करते.
संवेदनशील त्वचेसाठी रुटीन
संवेदनशील त्वचा पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन, रेडनेस आणि अॅलर्जीला बळी पडते. म्हणून फ्रॅग्रन्स-फ्री, हायपोअॅलर्जेनिक फेसवॉश वापरावा. गुलाबजल किंवा कॅमोमाइल बेस्ड टोनर वापरावा. मॉइश्चरायझरमध्ये पॅन्थेनॉल आणि सिरेमाइड्स असलेलं सौम्य उत्पादन वापरावं. मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरावं.
मेकअप किंवा धूळ मायक्लर वॉटरने साफ करून त्वचा सौम्य फेसवॉशने धुवा. नंतर सेंटेला युक्त सिरम किंवा स्किन-कॅलमिंग जेल लावा. मॉइश्चरायझरमध्ये सिरेमाइड्स व ग्रीन टी अर्क असलेले प्रॉडक्ट वापरावे. गरज असल्यास लिप बाम आणि आय क्रीमचा
वापर करा.