‘लाडक्या बहिणींना’ दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणार वाटप

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेतून लाभ घेणार्‍या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता एकत्रितपणे मिळणार आहेत.
या योजनेंंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये अशी एकूण 3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. ही रक्कम 10 ते 14 जानेवारीदरम्यान खात्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
महिला व बालविकास विभागाचे अधिकार्‍यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीपूर्वी महिलांना ही रक्कम मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 15 जानेवारी रोजी होणार्‍या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही महिन्यांचे हप्ते आधीच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीची मागणी केली आहे. पुढील आठवड्यात रक्कम खात्यात जमा होऊ शकते. सध्या राज्यात सुमारे सव्वा कोटी महिलांना मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत आहे.
अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘Beloved sisters’ will get two months’ worth of money together

महिलांच्या खात्यात  3,000 रुपये रक्कम जमा केली जाणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *