राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्ष; शिंदे गटाचा पराभव
जोडी तुझी माझी
भगूर नगरपालिकेत तीन दाम्पत्य तीन वेगवेगळ्या पक्षांतून नगरपालिकेत निवडून आल्याने हा पण एक वेगळा विक्रम मानला जात आहे. नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या प्रेरणा बलकवडे यांचे पती विशाल बलकवडे हे प्रभाग 9 मधून विजयी झाले. त्यामुळे पत्नी नगराध्यक्षा आणि पती नगरसेवक तर त्यांच्याच घराण्यातील दीपक बलकवडे आणि त्यांच्या पत्नी विद्या बलकवडे हेदेखील दोन वेगवेगळ्या प्रभागातून भाजपाकडून निवडून आले. तर उबाठाकडून जयश्री देशमुख आणि काका देशमुख हे पती-पत्नी विजयी झाले. त्यामुळे भगूर नगरपालिकेत एकाच वेळी तीन दाम्पत्य निवडून आल्याने सभागृहात मिस्टरांबरोबरच होम मिनिस्टरही दिसणार आहेत.
27 वर्षांची परंपरा खंडित
गेल्या 20 वर्षांपासून भगूर नगरपरिषदेत शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांचे प्राबल्य होते. यंदा मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, उबाठा आदी पक्षांनी एकत्र येत शिंदे गटाला आव्हान दिले होते. आमदार सरोज अहिरे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. करंजकर यांच्या ताब्यात असलेली भगूर नगरपरिषद त्यांनी खेचून आणली.
विकासकामांना मतदारांचा कौल
भगूर शहरात अनेक कामे प्रलंबित आहेत. विरोधक ती कामे करू देत नसल्याने याचा राग मतदारांच्या मनात होता, तो राग त्यांनी मतदान करून दाखविला आहे.
– आमदार सरोज अहिरे
नाशिक : प्रतिनिधी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, उबाठा युतीचा विजय झाला असून, नगराध्यक्षपदी युतीच्या प्रेरणा बलकवडे या तब्बल 1900 मतांनी विजयी झाल्या. गेल्या 27 वर्षांपासून सत्ता राखणार्या शिवसेनेचे विजय करंजकर यांच्या सत्तेला अजित पवार गटाने सुरुंग लावला.
रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता विहितगाव येथील मनपाच्या शाळेतील मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या एकूण चार फेर्या झाल्या. नगराध्यक्षपदासाठी असलेल्या प्रेरणा बलकवडे यांना 5407 मते, तर शिंदे गटाच्या अनिता करंजकर यांना 3494 मते मिळाली. या निवडणुकीत भाजपला 6 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागा, उबाठा गटाला 2 जागा अशा युतीला 11 जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला 8 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच एक जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.
त्याचप्रमाणे 20 जागांसाठी असलेल्या नगरसेवकपदांच्या निवडणुकीत प्रभाग 1 मधून सागर विजय चंदमोर, शिंदे गट 720, कांता श्याम गायकवाड, शिंदे गट, 624, प्रभाग 2- कापसाबाई विजय साळवे, शिंदे गट, 530, शंकर किसान करंजकर, शिंदे गट, 520, प्रभाग 3 – जयश्री काकासाहेब देशमुख, उबाठा, 668, प्रसाद अंबादास आडके, भाजप, 707, प्रभाग 4 मधून सुजाता विशाल शिरसाठ, भाजप, 489, काकासाहेब जनार्दन देशमुख, उबाठा, 325, प्रभाग 5 मधून सुदेश माधव वालझाडे, शिंदे गट, 334, सुचित्रा उर्फ अर्चना मंगेश बुरखे, शिंदे गट, 303, प्रभाग 6 मधून मनीषा अंबादास कस्तुरे, शिंदे गट, 449, दीपक चिंदरनाथ बलकवडे, भाजप, 697, प्रभाग 7 मधून अमोल कचरू इंदरके, भाजप, 369, विद्या दीपक बलकवडे, भाजप, 498, प्रभाग 8 मधून बबलू दत्तू जाधव, राष्ट्रवादी अजित पवार, 594, लता रामदास ठापेकर, राष्ट्रवादी अजित पवार, 582, प्रभाग 9 मधून अश्विनी राहुल भवर, राष्ट्रवादी अजित पवार 554, विशाल गोरखनाथ बलकवडे, राष्ट्रवादी अजित पवार, 570, प्रभाग 10 मधून अजय हरिश्चंद्र वाहने, अपक्ष, 296, सोनाली विक्रम सोनवणे, शिंदे गट, 453 हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी घोषणा करीत विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. निकालाची घोषणा होताच राष्ट्रवादी, भाजप, उबाठा युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Bhagur ends Karanjkar's rule after 27 years
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…