भगूरला खड्ड्याने घेतला एकाचा बळी

भगूरला खड्ड्याने घेतला एकाचा बळी

नाशिक: प्रतिनिधी
शहर तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यात पाणी साचले आहे. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. भगूर येथे पाईपलाईन साठी भर रस्त्यात खड्डा खोदण्यात आला होता, ऐन रस्त्याच्या मध्यभागी खड्डा होता. या खड्ड्यात पाणी साचल्या मुळे अंदाज न आल्याने अमित गाढवे (42) या युवकाचा मृत्यू झाला.

 

भगूर येथे सध्या पाईपलाईन चे काम सुरू आहे. त्यामुळे खोदकाम केल्यानंतर न बुजवल्याने पाणी साचले आहे. युवक जात असताना पाणी असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. भर रस्त्यात खड्डा खोदल्यानंतर तो बुजवला गेला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्याचा अंदाज न आल्याने
युवकाची गाडी खड्ड्यात आपटल्याने
गंभीर दुखापत झाली, या युवकाला तातडीने कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

भगूर पालिकेच्या गलथान कारभाराचा बळी

ऐन रस्त्यात खड्डा खोदलेला असताना या खड्ड्याभोवती कोणतेही बॅरिकेड्स लावले नव्हते, त्यामुळे खड्डा दिसून येत नव्हता, त्यातच पाऊस झाल्यामुळे हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला होता, परिणामी दुचाकीवरून रात्री 9 च्या दरम्यान येणाऱ्या गाढवे यांची दुचाकी थेट खड्ड्यात गेली, त्यात गाढवे यांचा मृत्यू झाला, भगूर नगरपालिका तसेच ठेकेदारांच्या हलगर्जीपणा यामुळे गाढवे यांना हकनाक प्राणाला मुकावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *