निफाड : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला . नियमांचा ससेमिरा संपला . विविध धार्मिक कार्यक्रम , विवाहसोहळे धुमधडाक्यात सुरू झाले . कार्यकर्त्यांच्या कार्यास हजेरी लावताना नेत्यांची दमछाक होते . मात्र , आपल्या व्यस्त दिनक्रमात नेत्यांची विवाहसोहळ्यात हजेरी चर्चेचा विषय होत आहे . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी अशाच एका विवाहसोहळ्यास हजेरी लावत नववधूची ओटीभरण करत आपल्या साधेपणाची लकेर उमटविली आहे . निफाड तालुक्यातील शिवडी येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते संजय शिंदे यांची पुतणी साक्षी आणि सोमठाणे ( ता . येवला ) येथील सखाराम दामू हारळे यांचे चि . सागर यांचा विवाहसोहळा रविवार , दि . २४ रोजी निफाड येथील देवकृपा मंगल कार्यालयात झाला . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवारांना निमंत्रित केले होते . व्यस्त दिनक्रमात ना . पवारांना विवाहसोहळ्यास उपस्थित राहून विवाहातील ओटीभरण सुरू होऊन गेली . ना . पवारांचे भाजपा कार्यकर्ते संजय शिंदे , तालुका भाजपा उपाध्यक्ष माधव शिंदे यांनी स्वागत केले . नववधू -वरांना आशीर्वाद देण्यासाठी ना . पवार थांबल्याने शिंदे परिवारातील महिलांनी ना . पवारांना ओटीभरणाचा आग्रह धरला . केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असल्याचा कोणताही बडे जाव न करता ना . भारतीताई पवार यांनी नववधूची ओटीभरण करून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देत औरंगाबादकडे प्रयाण केले . याप्रसंगी सखाहरी हराळे , भाजपा तालुका उपाध्यक्ष माधव शिंदे , द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अँड . रामनाथ शिंदे , दिलीप शिंदे , अशोक शिंदे , सुरेश शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते .
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…