केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांना दाखवले काळे झेंडे
मराठा समाजाचे कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात
मनमाड : आमिन शेख
– मेरी माटी मेरा देश अंतर्गत आज नांदगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री नामदार डॉ भारती पवार यांना मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता केंद्राची काय भुमिका आहे असा सवाल करत भिमराज लोखंडे विशाल वडघुले परेश राऊत यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी भारती पवार यांनी शहिदांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्याना मी विरोधकच म्हणेल त्यांनी संविधानिक मार्गाने आरक्षण मागावे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. आंदोलन कर्त्यना यावेळी पोलिसांनी अटक केली यानंतर भारती पवार यांनी आंदोलन कर्त्याशी चर्चा करत तुमच्या भावना मी नक्कीच वरपर्यंत पोहचवेल असे आश्वासन दिले.