दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे यांचे नाव जाहीर केल्याने आता दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे.भास्कर भगरे यांना महाविकास आघाडी कडून तिकीट मिळवण्यासाठी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदार संघात चर्चा आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात चार ते पाच आमदार हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडलेले आहे. त्यामुळे यावेळची दिंडोरी लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा होती.