बुलढाणा
सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ च्या भविष्यवाणी कडे शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असते, काल घट मांडणी केल्यानंतर आज भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार यंदा राज्यात पुरेसा पाऊस पडेल आणि कोरोना संकट जाईल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. जून महिन्यात चांगला आणि जुलै महिन्यात सर्व सामान्य पाऊस कोसळेल. अवकाळी पावसाचे सावट यंदाही कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. कोरोना रोगराई चे सावट राहणार नाही, राजकीय स्थिती जैसे थे राहील, देशाची संरक्षण स्थिती चांगली राहील असे भाकीत भेंडवळ च्या भविष्यवाणी ने वर्तवले आहे, पिके चांगले येतील मात्र भाव समाधानकारक नसेल, असे भाकीत वर्तवले आहे