आज साजरी होणार भोगी

आज साजरी होणार भोगी
नाशिक ःप्रतिनिधी
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो.आज भोगी सण साजरा होत आहे.भोगीसणासाठी खास वाल,वांगी,घेवडा,ओला हरबरा,गाजर,वाटाणा आदी भाज्या आणि तीळ टाकून केल्या जातात.भोगीचा नैवद्य दाखविण्यात येतो.

 

 

शहर आणि उपनगरांमध्ये भोगी आणि संक्रातीसाठी भाज्या,ववसा आदी उपलब्ध असून खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती.भोगीला सुगड पुजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी वाण पूजन प्रथा असेही म्हटले जाते. यामध्ये पाच छोटी मडकी पुजली जातात. या पाच मडक्यांत भाजी भाकरी ठेवले जाते. सुगडांतील भाजी भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा आहे.संक्रांतीच्या दिवशी या सुगडांचा सवाष्णी स्त्रियांना ववसा असतो. त्यानंतर ओटी भरणी आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम घेतले जातात.

 

 

मकर संक्रांतीचे तीन महत्त्वपूर्ण दिवस असतात. त्यामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. थंडीच्या मौसमात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते.त्याला भोगीची भाजी म्हणतात. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात.असा सर्वगुण संपन्न, उर्जादायक, उष्णता निर्माण करणारा आहार घेतला जातो.

 

 

 

वाल, पावटा, घेवडा, वाटाणा जे काही शेतात पिकेल त्याचा मसाले भात तयार केला जातो.सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो. सकाळी लवकर उठून स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. नवीन अलंकार परिधान करतात. घरासमोर रांगोळी काढतात आणि उपभोगाचे प्रतिक असणार्‍या इंद्रदेवाची पूजा केली जाते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *